शाल्मली
₹180.00
(Shalmali)
ले. रोहिणी दीक्षित
एका स्त्रीचा आयुष्यप्रवाह नदीच्या प्रवाहासारखा असतो. कुठेतरी दूर उंच उंच डोंगरावर उगम पावून प्रवाहासोबत डोंगर-दऱ्या, खाचखळगे, चढ-उतार यांना पार करत सतत प्रवाहित राहणं एका नदीला जसं न चुकणारं असतं तसंच स्त्रीलाही. सुखदुःख,उनसावलीच्या खेळात कधी आनंद तर कधी प्रचंड वेदना हृदयावर घाव घालत असतात. एवढं सगळं होऊनही प्रवाहित राहणं, वाहणं, म्हणजेच जगणं थांबत नाही. ते थांबूनही चालत नाही. नदी आणि स्त्री दोघींच्याही भावनांना फार क्वचित समजून घेतलं जातं.
शाल्मली हे फक्त एक लिखाण नाही तर ही एका संघर्षाची गोष्ट आहे.




