सुट्टी एके सुट्टी

200.00

(किशोर कथा)

ले. कविता मेहेंदळे

श्रीमती कविता मेहेंदळे या कवयित्री म्हणून सुपरिचित आहेतच, परंतु गद्य लेखिका आणि विशेषतः बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या कवयित्री म्हणून त्यांचे विशेष ओळख आहे.

‘सुट्टी एके सुट्टी’ हा त्यांचा मुलांसाठीच्या बारा कथांचा संग्रह वाचनीय आहे. सर्व कथा आशयसंपन्न आहेत. या लेखनाचं तिसरं बलस्थान म्हणजे संपन्न आशयाचा सुंदर आविष्कार या सर्व कथांमधून झालेला आहे. कथांची मांडणी रसपूर्ण आहे.

या लेखनाचे चौथे बलस्थान म्हणजे लेखिकेला मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असावे आणि त्यानुसार बालविश्वातीलच घटना, प्रसंग यांची निवड लेखिकेने केली आहे. यातील पात्रे ही खऱ्या अर्थाने बालनायक आणि बालनायिका आहेत. त्यांची कल्पनाशक्ती, त्यांच्या मनातील आंदोलने, त्यांचे बालसुलभ विचार यांचीच वीण या कथांमधून येते. हे भरतकाम लेखिकेला चांगले जमले आहे.

एकूणच या सर्व कथा मुलांना आवडणाऱ्या आहेत आणि मोठ्या माणसांनी, पालकांनी, शिक्षकांनी मुलांना सांगण्यासारख्या आहेत.

या संग्रहाने बालसाहित्याच्या प्रांगणात चांगली भर घातली आहे यात शंकाच नाही.

– डॉ. न. म. जोशी

You may also like…