Description
मूळ लेखक: श्री. बसवराज नाय्कर
अनुवाद: श्री. अरविंद हेब्बार
हे भारतवर्ष एकेकाळी आसेतुहिमाचल पसरलेले होते. अत्यंत समृद्ध नैसर्गिक संपत्ती, मानवनिर्मित वस्तू, कपडे, कलाकृती या सार्या वैभवाने परिपूर्ण असा हा देश होता. इथे निर्मिलेल्या होड्या व जहाज आदींना पाश्चिमात्य देशात मोठी मागणी होती. नालंदासारखी जगद्विख्यात विश्वविद्यालये येथे होती. या काळात भारत जगभरातल्या अनेक देशात व्यापार करून अपार संपन्न देश बनला. परंतु कालांतराने हीच संपत्ती या देशासाठी घातक ठरू लागली. एकेकजण भारतावर स्वारी करून लुटू लागले. व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. इथल्या छोट्या-छोट्या संस्थानिकांचे आपसातील वैर, हेवेदावे त्यांनी सूक्ष्मपणे हेरले आणि एकाला साथ देऊन दुसऱ्याचे संस्थान आपल्या ताब्यात घेऊ लागले. ब्रिटीशांची ही मोहीम दक्षिण हिंदुस्थानात सुरू होऊन पुढे साऱ्या देशभर पसरली आणि कंपनी सरकार उदयास आले.
अठराव्या शतकाचा प्रारंभ झाला आणि ब्रिटिशांनी चालवलेल्या कुटिल कारस्थानांविरुद्ध असंतोष वाढू लागला. कंपनी सरकारने दत्तकविरोधी कायदा लागू करून नरगुंद संस्थान आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता नरगुंद नरेश श्री. भास्करराव भावे यांनी ब्रिटिशांविरुद्ध जो लढा दिला त्याची ही कहाणी!
*