तिसरे पुस्तक

300.00

शब्दांचा सोस नसलेली ओघवती भाषा, चपखल शब्दयोजना, निरीक्षण शक्ती आणि चित्रदर्शी शैली यामुळे गौरी गाडेकर यांच्या या कथांच्या राज्यात वाचक सहज ओढला जातो.

एकत्रित कुटुंबव्यवस्थेचा पुरस्कार करणार्‍या या कथांमध्ये निर्णयक्षमता असणार्‍या खंबीर नायिका येतात, ज्या मायेची माणसं सांभाळताना तडजोडीच्या जात्यात भरडल्या जात असतानाच संधी मिळाल्यावर आपल्या अंगी असलेल्या मूलभूत गुणांच्या आधारानं आपल्या स्वातंत्र्याचा हुंकार देत उभ्या राहतात.

या स्त्रीकेंद्री कथांमध्ये अनुभवाचे पदर, त्यातील ताणतणाव, भावात्म पातळीवरील आंदोलने आणि सामाजिक-कौटुंबिक चौकटीतल्या क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त होत राहतात आणि म्हणून वाचकाचे या कथांशी बंध जुळून येतात.

– रश्मी कशेळकर

Category: