‘प्रवासी पक्षी’मधून उमगलेले कुसुमाग्रज!

350.00

(Pravasi Pakshi madhun umglele Kusumagrah)
(समीक्षा)
ले. आशालता कांबळे

‘कुसुमाग्रज’ म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर. अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक असलेल्या या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मराठी कवीराजांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘प्रवासी पक्षी’ हा त्यांचा एक महत्वाचा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहावरील प्रा. आशालता कांबळे यांच्या अभ्यासपूर्ण लेखणीतून सिद्ध झालेला अप्रतिम समीक्षाग्रंथ म्हणजे ‘प्रवासी पक्षी’मधून उमगलेले कुसुमाग्रज!’

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी मंगेश पाडगावकर यांनी या समीक्षाग्रंथाचे केलेले कौतुक आणि मुखपृष्ठावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यकार, चित्रकार, छायाचित्रकार श्री. ल. म. कडू यांनी स्वत: कुसुमाग्रज यांचे कॅमेराबद्ध केलेले छायाचित्र यांनी या पुस्तकाच्या वैशिष्ठ्यांत अनमोल अशी भर घातली आहे. सुप्रसिद्ध चित्रकार श्री. जयदीप कडू यांनी हे मुखपृष्ठ साकार केले आहे.

You may also like…