जागृती (एकांकिका)

(Jagruti)
ले. जयदेव सोमनाथे

महान-थोरांच्या प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद, त्यांची समाजप्रबोधन करण्याची तळमळ, त्यांच्या आचार-विचारांतून आणि सत्कर्मातून लक्षात घेऊन, तीच इच्छा उरात ठेवून आपण सुद्धा समाजजागृती करावी हा मूलमंत्र घेऊन श्री. जयदेव बळीरामजी सोमनाथे यांनी नाटक हे माध्यम निवडलं. नाटक आणि अभिनय हा त्यांचा बालवयापासून ते आजतागायत जोपासलेला छंद!

मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारे प्रभावी माध्यम म्हणजे नाटक. सुसंस्कृत मानवी मनाचा अर्थपूर्ण स्वप्नविलास म्हणजे कला.

‘जागृती’ हा एकांकिका संग्रह ग्रामीण जीवनाचं वास्तववादी दर्शन, तेथील ज्वलंत समस्या, जसे- अंधश्रद्धा, अज्ञान, व्यसनाधिनता, गुलामी, वासनांधता या साऱ्या बाबींची सांगड घालतो. विशेष म्हणजे या एकांकिकांनी प्रयोगाच्या सादरीकरणाची विक्रमी नोंद केलेली आहे.

या एकांकिका संग्रहातील एकांकिकांचे सादरीकरण विदर्भस्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांत; तसेच शाळा, कॉलेज, समाजकार्य विभाग, कामगार कल्याण मंडळ यांनी करून निर्मिती, अभिनय, दिग्दर्शनाची, नेपथ्याची पारितोषिके पटकावली आहेत.

~