ओसाड वाडा
₹220.00
(Osad Wada)
ले. खालीदा शेख
खालीदा शेख मॅडमनी ‘ओसाड वाडा’ ही दीर्घकथा मला वाचायला दिली. एकदा वाचून समाधान होईना म्हणून मी ती अनेक वेळा वाचली. ‘प्रेम’ म्हटलं की त्यांच्या लेखणीला सप्तरंगी धुमारे फुटतात आणि या सप्तरंगांत आपण विरघळून जातो.
ओसाड वाडा हा त्यातलाच एक नमुना ! आपल्या मृत्यूनंतर आपल्या नातवाने आपल्या वाड्यात येऊन आपलं श्राद्ध घालावं अशी एका आजीची प्रबळ इच्छा! अमेरिकेत जन्मलेला नातू या गोष्टींपासून पूर्ण अज्ञान. पण तरीही तो आजीचं श्राद्ध घालण्यासाठी कोकणात, त्यांच्या ओसाड वाड्यात काही दिवसांची रजा घेऊन येतो. सुधा- सारखी सुलक्षणी मैत्रीण त्याला मिळते. तिला संदेशमध्ये भावी जीवनाचा जोडीदार दिसतो. पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून तो पुन्हा अमेरिकेत जातो. ‘ओसाड वाडा’ कथेला इथेच पूर्णविराम मिळायचा, परंतु प्रतिभासंपन्न लेखणी कधी, कशी कलाटणी घेईल याचा थांगपता नसतो….
खलनायक नसलेल्या या ‘ओसाड वाडा’च्या प्रेमकथेच्या आपण मनापासून प्रेमात पडतो. ही दीर्घकथा राज्य पुरस्कारासाठीचा दरवाजा नक्कीच ठोठावणार! त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा….!
– गंगाराम गवाणकर