कलापूरचे सूरसाधक

350.00

ले. प्रभाकर तांबट

‘कलापूर’ हे नाव सार्थ ठरवणारे ठिकाण म्हणजे ‘कोल्हापूर!’ माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या विविध कला या नगरीत विकसित झाल्या आणि फुला-फळांनी बहरल्या. त्यांना उदार राजाश्रयाबरोबरच दिलदार लोकाश्रयही लाभला.

या कलापूरमध्ये जे जे संगीत कलेचे श्रेष्ठ उपासक झाले, त्यांचा वेध श्री. प्रभाकर तांबट यांनी ‘कलापूरचे सूरसाधक’ या पुस्तकात घेतला आहे. अनेक श्रेष्ठ आणि दिग्गज कलाकारांबरोबरच तितक्याच गुणाढ्य परंतु उपेक्षित आणि विस्मृतीच्या अंधारात दडलेल्या अनेक संगीत कला साधकांना येथे प्रकाशझोतात आणलेले आहे हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच या पुस्तकाचे मोल वाढले आहे. येथे लेखकाने जे परिश्रम घेतले आहेत, ते अगदी स्पष्ट लक्षात येतात.

कोल्हापुरातील तब्बल ४७ अतिशय प्रतिभासंपन्न शास्त्रीय गायकांचा परिचय असलेले हे पुस्तक संगीताच्या अभ्यासकांबरोबरच प्रत्येक संगीतप्रेमीच्या वैयक्तिक संग्रहात असावे असे आहे.

You may also like…