नमो स्वामी राजम्

220.00

(Namo Swami Rajam)

ले. प्रकाश कामत

श्रीपाद, शेषाद्री, गणेशनाथ, गोस्वामी, स्वामी अशी विविध नावे धारण केलेले अवलिया स्वामी हे माझे गुरु!

माझे गुरु, त्यांचा जीवन प्रवास, त्यांचे कार्य सर्वांना ज्ञात व्हावे, माझ्याकडून स्वामींचे चिंतन व्हावे व सेवा घडावी हा मानस ठेवून केलेले हे लेखन.

खरं तर स्वामींची स्वत:ची इच्छा त्यांचे चरित्र कुणी लिहू नये, यावर चर्चा होऊ नये, अशी होती. त्यामुळेच त्यांनी त्यांचे स्वत:चे खरे नाव, गाव याबद्दल सामान्यत: कायमच मौन राखले. मात्र माझ्याकडून हे लेखन सुरू झाल्यावर, माझे स्वानुभव, स्वामींकडून मिळालेले ज्ञान यांच्या जोडीला अनेक भक्त मंडळींकडून माहिती मिळत गेली आणि लेखन उद्देशास स्वत: स्वामींचा पूर्ण आशीर्वाद असावा असे जाणवू लागले. अर्थात संपूर्ण लेखन झाल्यावरही अपूर्णतेची भावना मनात आहेच.

स्वामी हे सिद्ध पुरुष होते. या लेखनातून त्यांचे ध्येय, त्यांचा जीवन प्रवास, त्यांचा त्याग सर्वांसमोर यावा हीच माझी प्रामाणिक भावना आहे.

– प्रकाश मा. कामत

Description

ले. प्रकाश कामत

You may also like…