पसंत आहे मुलगी!

300.00

आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.

(Pasant Aahe Mulagi)

दार एका ललनेने उघडलं. रंभा, मेनका आणि उर्वशी यांचं खूप चांगलं मिश्रण असलेली अप्सरा समोर होती. मला समोर पाहून ते किंचाळली. खालीच कोसळणार होती. मी चटकन तिला आधार देण्यासाठी तिचा हात प्रथम हातात धरला…
(पसंत आहे मुलगी)

चौथीपासून मी रोज वर्तमानपत्र वाचू लागलो. बॉम्बस्फोटाच्या बातम्यांनी अतिरेकी महा डेंजरस असतात, असं वाटायला लागलं. सर गणित शिकवत असताना, बाई हिंदी शिकवत असताना, मी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवत होतो. बारीक लक्ष ठेवणं म्हणजे एकच डोळा बारीक करून पाहणं. मला आमच्या सरांनी विचारलं सुद्धा, “रम्या गाढवा, सारखा डोळा बारीक करून का पाहतोयस त्या घाट्यांच्या रश्मीकडे?“
(अतिरेकी)

आमच्या गावात एक प्रथा होती. जी मुलगी, महिला, राखी बांधेल, तिच्या ताटात चार-आठ आणे ओवाळणी टाकायची. मी लहानपणापासून सुधारणावादी होतो. पुरोगामी विचारांचं बाळकडूच मला मिळालं होतं. त्यामुळे कुणाच्याही ताटात मी पैसे तर टाकत नव्हतोच, पण त्यांच्या ताटातले पैसेच शक्य झाले तर उचलायचो. त्यामुळे गल्लीतील मुली मला राख्या बांधायला येत नसत…
(`दादा, ते आले ना!`)

योगायोगानं माझ्या डाव्या बाजूच्या बाकावर शेजारचीच लेल्यांची पमी बसली होती. मी फटाक्कन माझं हृदय तिला द्यायचं ठरवलं. पण हृदय द्यायची प्रोसिजर माहीत नव्हती. विज्ञानाचे सर, हृदय, ते कसं काम करतं, हे समजून देताना स्वत: प्रयोग करून दाखवीत असत. पण कुणाला हृदय द्यायची प्रोसिजर काही सरांनी दाखवली नव्हती…
(माझ्या वडिलांच्या गाढवाच्या लग्नाची गोष्ट)

गोंधळात गोंधळ म्हणजे न्यूयॉर्क एअरपोर्टवर आमचं सामान गहाळ झालेलं लक्षात आलं. संकटात सापडल्यावर मराठी माणसांची किती धांदल उडते ते एअरपोर्टच्या झाडूवाल्यांपासून टॅक्सीवाल्यांपर्यंत आणि प्रवाशांपासून एअरपोर्ट ऑथोरिटीपर्यंत सगळ्यांना समजलं होतं. त्यापैकी भारतीय आम्हाला विविध सल्ले देत होते. दोन-चार मराठी माणसं मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात होती. माझी पुतणी धापा टाकत आली आणि म्हणाली, “यू.एस.च्या टी.व्ही. वरून तुमचं लगेज मिसप्लेस झाल्याचं सगळीकडे दाखवलं जातंय. आता लवकरच मदतीचा ओघ सुरु होईल. कपडेलत्ते, भांडीकुंडी, गाद्या, चादरी, डिशेस पासून वॉशिंगमशीन, लॅपटॉपपर्यंतच्या जुन्या वस्तू येतील.“ माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं…
(माझ्या परदेश प्रवासाची दैना)

Description

ले. शरद पुराणिक

You may also like…