पूतना परत येतेय…

480.00

(Pootana Parat Yetey…)

सोबत: `अडगळ मनातली`हा अगम्या यांचा काव्यसंग्रह सप्रेम भेट!
ले. अगम्या

प्रत्येक गोष्टीची म्हणजे अगदी प्रत्येक अणूरेणूचीही एक स्वतंत्र अशी इच्छाशक्ती असते. ही इच्छाशक्ती जेवढी सृजनात्मक तेवढीच, किंवा त्याहीपेक्षा जास्त संहारक! कारण सृजनाला संस्काराचं बंधन असतं. पण संहाराला ते असत नाही.

एक मानव म्हणून असणारी मूळ स्वार्थी वृत्ती, पशूप्रमाणे क्रूरता आणि त्यात भर म्हणून विज्ञानाने उघडून दिलेलं अपरिमित शक्तींचे भांडार या सगळ्याचं मिश्रण केवळ मानवातच होऊ शकतं. या एकमेवाद्वितीय मिश्रणाइतकं भयंकर अजून काय असेल?

आगराच्या वाडीचा प्रतिस्पर्धी असाच संहारक होता. त्याची शक्ती अफाट होती. बंधनरहीत होती. कित्येक घातक शक्तींच्या अनेक वर्षांच्या पाठींब्याने वाडीतली ती निर्दय शक्ती अक्षरश: माजली होती.

या शक्तीला शह द्यायचा, तर रामदासलाही आडमार्गाच्या त्याच दलदलीत उतरावं लागणार होतं. पण दलदलीत उतरलं तरीही कमळासारखं त्या दलदलीपासून अलिप्त रहायला हवं, हेही रामदासला माहीत होतं.

रामदाससारखेच डॉक्टर देसाईही मागे फिरणार नव्हते. आता जे व्हायचं ते होवो! पण मागे फिरायचं नाही. जायचं तर पुढेच! डॉक्टरांनी ठरवलं. देवत्व म्हणतात ते हेच का? कधी कोणत्या रूपात ते माणसाठायी निर्माण होतं कुणास ठाऊक!

*

You may also like…