अंतर्नाद

₹270.00

(Antarnad)
ले. खालीदा शेख
~

“लेखिका, कवयित्री खालीदा शेख यांचे प्रकाशित होत असलेले ‘अंतर्नाद’ हे सातवे पुस्तक आहे.

आजूबाजूला घडणाऱ्या घटना लेखिकेच्या मनाला चटका लावून जातात. मग ते का घडले? कसे घडले? याविषयीचे ‘अंतर्नाद’ लेखिकेला लिहिण्यासाठी प्रेरित करतात.

मुग्धा-मनीषचा मोडलेला संसार पुनः जोडण्याचा प्रवास ‘अंतर्नाद’ या कथेतून लेखिकेने आपल्या सहज, ओघवत्या भाषेत उलगडला आहे. कवितांची ओंजळ कवितासंग्रहाच्या रूपाने मेहेंदळे सरांना अर्पण करण्याची अतृप्त इच्छा कशाप्रकारे पूर्ण करून घेतली जाते याचा अनुभव ‘ओंजळ’ या गूढरम्य कथेतून गुंतवून ठेवतो. अशाच विविध विषयांवरच्या, विविध रसांमध्ये रंगवलेल्या कथा या ‘अंतर्नाद’ या कथासंग्रहातून लेखिकेने वाचकांच्‍या भेटीला आणल्या आहेत.

लेखिकेकडे विषयांचे वैविध्य आहे. ते मांडण्याची, वाचकांना आवडेल अशा पद्धतीने लिहिण्याची कला आहे. लेखिकेकडे प्रगल्भ, सकस लिखाण करण्याची क्षमता आहे.

लेखनातील सातत्य, विषयांमधील वैविध्य, वाचकांना खिळवून ठेवणारी भाषाशैली यामुळे हा कथासंग्रह वाचकांना आवडेल आणि पुन्हा नवीन विषयांवरच्या कथा, कादंबरी घेऊन त्या वाचकांच्या भेटीला येतील. त्यांनी लिहिते रहावे, नवनवीन विषयांची आपल्या कथांमधून गुंफण करीत रहावे यासाठी माझ्या शुभेच्छा!”

– दत्ता सावंत

You may also like…