वर्तुळ

380.00

(vartul)
ले. किरण आचार्य

वर्तुळ: अभ्यास जीवनातील विविध नाते-संबंधांचा!

आयुष्यात कसे वागावे आणि कसे वागू नये यावर थेट मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तकं असतात. पण अशीही काही पुस्तकं असतात, जी थेट या विषयाला हात घालत नाहीत. मात्र ती, त्यातील लेखनातून अशा पुस्तकांपेक्षा अधिक परिणामकारक मार्गदर्शन करू शकतात.

श्री. किरण आचार्य यांच्या `वर्तुळ` या प्रस्तुतच्या पुस्तकातील लेखन हे असेच लेखन आहे. हे लेखन सर्वसमावेशक आहे. काही वेळा ते वाचणाऱ्याला प्रेरणा देईल तर काही वेळा वाचकाचे डोळे उघडण्याचे काम करेल. काही वेळा ते भविष्यातील धोके आपल्या लक्षात आणून देईल तर काही वेळा, अगदी सहगत्या `जगावे कसे?` याचे मार्गदर्शन करेल. जीवनातील आणि प्रपंचातील विविध सुखदु:खे आणि संकटे यांचा सामना कसा करावा, आणि कसा करू नये, हे येथे मांडलेल्या अनेक सत्य घटनांना वाचून वाचकाला कळू शकते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने वाचावे असे हे लेखन आहे.

रक्ताच्या नात्यांबरोबरच जीवनात निर्माण होणाऱ्या इतर मानवी नात्यांचा, त्यातील सकारात्मक बाबींबरोबरच अनेकदा त्यात असलेल्या गुंतागुंतीचा विचार करणारा हा `वर्तुळ` या पुस्तक-मालिकेचा पहिला भाग आहे. हे लेखन वाचकाला बरेच काही देणारे आहे…

– पराग र. लोणकर.

You may also like…