वदति कबीर:

₹450.00

(vadati kabir)
ले. सुनन्दा श्रीराम देवस्थळी
~
कबिरांच्या मूळ हिंदी दोह्यांसोबत त्यांचा संस्कृत अनुवाद आणि मराठीतील भावार्थ/विवेचन अशी त्रिस्तरीय मांडणी येथे आहे. कबिरांच्या लोकभाषेतील, सहज वाटणाऱ्या दोह्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर हा या पुस्तकात केलेला विशेष प्रयोग आहे. अनुवाद करताना संस्कृतचे व्याकरण, संधी, समास, मात्रा आणि लय यांचा विचार केला आहे. कबिरांच्या जन्माविषयीच्या आख्यायिका, बालपण, संसार, साधनाप्रवास आणि रामानंदांच्या सहवासातून झालेला आध्यात्मिक प्रवास यांचा संदर्भही येथे मांडला आहे. लेखिकेच्या संस्कृत आणि मराठीच्या गाढ्या अभ्यासातून तयार झालेला हा ग्रंथ केवळ भाषांतरग्रंथ न राहता कबिरांच्या विचारांचा रसास्वाद घडवणारा ग्रंथ बनलेला आहे. निवडक १०० दोहे आणि ५० पदे यातील कबिरांच्या वाणीचा सत्संग संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषाप्रेमींना घडवणारा ग्रंथ – ‘वदति कबीर:’ हा संस्कृत अनुवाद वाचून कबिरांचे साहित्य जास्त जवळचे वाटते असा अनेक वाचकांचा अभिप्राय आहे.

You may also like…