पुस्तकांना एक्स्पायरी डेट नसते!
₹380.00
(pustakanna expiry date naste)
ले. सुनिल पांडे
“पुस्तक म्हणजे केवळ कागदावर छापलेले शब्द नव्हेत; ते अनुभवांचं, विचारांचं, आठवणींचं आणि संस्कारांचं जिवंत भांडार असतं.
श्री. सुनील पांडे यांच्या या ललित लेखसंग्रहातून उलगडतो तो एका वाचकाचा प्रदीर्घ आणि मनस्वी वाचनप्रवास. बालपणी अक्षरओळख होण्यापासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू पुस्तकांच्या विश्वात घेऊन जातो. सुरुवातीला अक्षरे जोडताना झालेली धडपड, शिक्षकांचे अनुभव, पहिली गोष्ट वाचल्याचा आनंद, शाळेच्या ग्रंथालयातून हातात पडलेली पुस्तके, चांदोबा, दिवाळी अंक, कथा-कादंबऱ्या आणि पुढे समृद्ध होत गेलेले वाचनविश्व- या सगळ्या आठवणींमधून लेखकाच्या मनात रुजत गेलेलं पुस्तकप्रेम आपल्यालाही आपलंसं वाटतं.
या लेखांमधून पुस्तकांशी जोडलेल्या अनेक आठवणी आणि अनुभव समोर येतात. अनेक पैलूंना लेखकाने आपल्या सहज, ओघवत्या शैलीत स्पर्श केला आहे. या प्रवासात कधी विनोद आहे, कधी हळवेपणा आहे, कधी आठवणींची ऊब आहे, तर कधी वाचनसंस्कृतीविषयीची तळमळही आहे.
पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकानं, वाचनाची गोडी लागावी अशी इच्छा असणाऱ्या प्रत्येकानं आणि नव्या पिढीला पुस्तकांच्या जगाशी जोडू पाहणाऱ्या प्रत्येकानं वाचलाच पाहिजे असा लेखसंग्रह आहे.
वस्तू जुन्या होतात, तंत्रज्ञान बदलतं; पण उत्तम पुस्तक कधीच जुनं होत नाही. कारण-
‘पुस्तकांना एक्सपायरी डेट नसते!’




