Description
“दोस्त हो!
मराठी भाषेतील प्रत्येक साहित्यिक आकार-प्रकार मी हाताळलेला आहे; समरसून साकारलेला आहे. त्यामुळे माझा काळ अतिशय आनंदात गेला आणि सार्थकी लागला असे वाटते.
एकांकिका हा माझा सर्वात प्रिय आविष्कार आहे. मी लिहिलेली प्रत्येक आणि मी अथवा अन्य कोणी सादर केलेली एकांकिका म्हणजे आनंदाचा अक्षय खजिना आहे. जणू स्मरण-सुवर्ण-संचित आहे…
प्रत्येक एकांकिकेने मला कितीतरी कायमचे मित्र, चाहते, रसिक मिळवून दिले. अनेक प्रयोगांच्या, त्यातील अनेक कलाकारांच्या, फार काय जागांच्याही सुखद आठवणी आहेत.
माझ्या कॉलेज जीवनात ‘यूथ फेस्टिवल’ हा जणू काही नावाप्रमाणेच सण-उत्सव होता. महाराष्ट्रातील विविध एकांकिका स्पर्धा त्याकाळी आम्हा तरुण कलावंतांना खुणावत असत, भूल घालत असत. एकांकिकेत लागणारी प्रॉपर्टी जमवणे ही ऐन वेळेची मोहीमच! अशा असंख्य आठवणी! पण आता आनंदाच्याच!
यातीलच या नऊ निवडक एकांकिका!”
– रमेश कोटस्थाने