लक्ष्मी शरणम् गच्छामी

350.00

(Lakshmisharanam gachchami)

मूळ लेखक : प्रेम जनमेजय
अनुवाद: विजय तरवडे
~
प्रेम जनमेजय
सध्याच्या काळातील सर्वाधिक चर्चित विनोदलेखन प्रकाराच्या संवर्धन आणि सृजनक्षेत्रामध्ये प्रेम जनमेजय यांचे विशिष्ट असे स्थान आहे. विनोदी नाटके, संस्मरणे, प्रवाससाहित्य, बालसाहित्य, नवसाक्षरांसाठी साहित्य इत्यादी त्यांचे विपुल लेखन आहे. वीस वर्षांपासून सातत्याने ते संपादित करत असलेल्या ‘व्यंग्ययात्रा’ या त्रैमासिकाला अनेक साहित्यिक व पत्रकारिता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या खास अशा विनोदी शैलीने लिहिलेल्या त्यांच्या जवळपास सर्वच लेखनाला विविध अतिशय प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाले आहे.
~
श्री. विजय तरवडे
‘लक्ष्मी शरणम् गच्छामी’ हा अनुवादित कथासंग्रह हे श्री. विजय तरवडे यांचे ५१वे पुस्तक आहे. गेली अनेक वर्षे केसरी, तरुण भारत, नवाकाळ, प्रभात, पुण्यनगरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ इत्यादी दैनिकांमध्ये त्यांचे सदरांच्या स्वरूपात किंवा नैमित्तिक असे लेखन सातत्याने चालू असते. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यशास्त्र, इतिहास आणि पत्रकारिता या विषयांवरील पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत.
श्री. विजय तरवडे हे अनुवाद क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध आणि अनुभवी असे नाव आहे.
~
हरिशंकर परसाई, शरद जोशी यांसारख्या विनोदी लेखकांनी आपल्या शैलीद्वारे समाजातील- विशेषतः व्यवस्थेतील विसंगतीकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. प्रेम जनमेजय यांनी विनोदाच्या या परंपरेला समर्थपणे पुढे नेले आहेत. संपादक म्हणून अतिशय समर्थपणे काम करत असतानाच त्यांनी आपली लेखनातील धार कायम ठेवली आहे. त्यांची भाषा आणि शैली ही त्यांची ओळख बनली आहे. विसंगतीवर तिखट कटाक्ष टाकणाऱ्या त्यांच्या लेखनाने मला प्रभावित केले आहे.
– डॉ. दामोदर खडसे यांच्या प्रस्तावनेतून.

You may also like…