(MUTATIUM)
ले. पार्थ देसाई
Mutatium ही कहाणी आहे थॉमस नावाच्या एका गर्भश्रीमंत व्यापाऱ्याची आणि Sam या त्याच्या विमानाच्या वैमानिकाची!
Bermuda Triangleवरून विमान जात असताना विमानात बिघाड होतो अन् विमान कोसळते. शुद्धीवर आल्यावर या दोघांना लक्षात येते, की आपण एका वेगळ्याच विश्वात पोहोचलो आहोत, ज्यातील मानव हा प्रगतीपूर्व स्थितीत असलेला, नव्या सुधारणांपासून खूप दूर असलेला, केवळ नैसर्गिक साधन संपत्तींच्या सहाय्याने समूह करून वास्तव्य करणारा असा आहे.
थॉमस आणि sam यांना आपल्या पूर्वजगात परत जायची प्रचंड ओढ आहे. आपल्या कुटुंबियांना भेटण्याची दुर्दम्य इच्छा आहे. हे दोघे आणि त्यांच्या आधी आधुनिक जगातून (Bermuda Triangleवरून जाताना जहाजे, विमाने अपघातग्रस्त झाल्यामुळे) या विश्वात येऊन पोहोचलेली इतर मंडळी; यांनी आपल्या मूळ जगात परत जाण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी (उपलब्ध असलेल्या साधनांच्या मदतीने) केलेलं संशोधन, समोर उभी ठाकलेली आव्हाने आणि या साऱ्या प्रयत्नांस या वेगळ्या विश्वातील मूळ लोकांनी नाकारलेले सहकार्य याची ही कहाणी जितकी उत्कंठावर्धक आहे; तितकीच थरारकही आहे!
`पार्थ देसाई` हा या कादंबरीचा लेखक, इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असलेला, अफाट कल्पनाशक्ती, लेखन-विषयाचा सखोल अभ्यास आणि अविश्वसनीय लेखनकौशल्य असलेला विद्यार्थीवयातील `चमत्कारच` म्हणावा लागेल.
पार्थची ही कादंबरी १) आजच्या मुला-मुलींना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी केवळ खारीचाच नव्हे; तर फार मोठा वाटा उचलणार आहे. २) इंग्रजी भाषा ही किती सहज, सोपी आणि आपलीशी वाटू शकते, याची जाणीव हे पुस्तक सर्वांना करून देणार आहे. आणि ३) एका अतिशय अद्भुतरम्य विश्वाची ओळख ही कादंबरी आपल्या सर्वांना करून देणार आहे.
विद्यार्थी आणि त्यांचे पालक अशा दोघांनीही वाचलीच पाहिजे अशी ही कादंबरी आहे.
Mutatium ही कादंबरी कमालीची वाचनीय आहे. अतिशय उत्कंठावर्धक आहे. एका नवीन जगाची आपल्या सर्वांना ओळख करून देणारी आहे.
केवळ मराठी साहित्य प्रकाशित करणाऱ्या आपल्या प्रकाशन संस्थेने हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित करण्यामागे ही सर्व कारणे आहेत…
**
मूळ किंमत ₹ ३५०
सवलतीत फक्त ₹ १८० मध्ये!
आपण पुढील क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.
संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807