जत्रा घडली नागोबाची
₹220.00
(Jatra Ghadali Nagobachi)
ले. चुडाराम बल्हारपुरे
‘जत्रा घडली नागोबाची’ हे तीन अंकी सामाजिक नाटक. यात एकूण प्रमुख १७ कलाकारांच्या भूमिका आहेत. या नाटकाची सुरुवात लेखकाने मोठ्या रंजकतेने केली आहे. नाटक हे रंजकतेकडून प्रबोधनाकडे जाणारी नाट्यप्रक्रिया आहे. आरंभी शाहीर, नरनारी, गावकरी यांचे सुरेख संवाद आहेत. अडपल्ली गोगावची ही लोककथा आहे. या लोककथेतून मागील जन्माचे संदर्भ पुढे येतात. आरंभच फार सुंदरतेने अधोरेखित केला आहे. लोककथेचे बीज हे शाहिराच्या लोकरंजन कलेतून बाहेर येते, ही अनुभूती सुरेख व ऊर्जित करणारी आहे. नाटककारांनी लोककथात्मकता या नाट्यकृतीच्या आरंभबिंदूपासून तर शेवटपर्यंत सक्षमपणे संवादित केली आहे. शाहीर आणि नरनारीमधील संवाद अत्यंत रंजक आणि बोलके आहेत. आरंभीपासूनच नाट्यकृती आस्वाद प्रक्रियेकडे मार्गक्रमण करणारी आहे. लोककथांमध्ये विलक्षण रंजकता आणि प्रबोधनात्मक जनसंवाद घडवून आणण्याची सक्षमता नाटककार श्री. चुडाराम बल्हारपुरे यांच्या लेखणीत आहे. नाट्यकृतीत नाटककारांनी उत्तम प्रतिमा साधून नाट्यशैलीचे सुंदर उदाहरण त्यांनी रसिकासमोर मांडले आहे.




