‘दिली’कथा
₹425.00
(dili katha)
ले. डॉ. दिलीप पाखरे
~
“रत्नागिरीतील मनोरुग्णालयात १९८५ मध्ये मी मनोविकार तज्ज्ञ म्हणून माझ्या शासकीय सेवेची सुरुवात केली आणि कालांतराने वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदभारसुद्धा सांभाळला. तेथील व्यवसायोपचार तज्ञ डॉ. दिलीप पाखरे, वर्षानुवर्षे मनोरुग्णालयाच्या भिंतींच्या आत राहणाऱ्या व समाजानेच नाही, तर कुटुंबानेही नाकारलेल्या या रुग्णांच्या विझलेल्या मनांना नवी पालवी कशी फुटवतो आणि त्यांचे हे जीवन आनंदी कसे बनवतो हे पाहून मी थक्क झालो.
आज त्यांच्या निवडक कथांचा हा संग्रह प्रसिद्ध होत आहे. या सर्व कथा त्यांच्या अनुभवविश्वातून साकार झाल्या आहेत आणि म्हणूनच त्या काळजाला जाऊन भिडतात. डॉ. पाखरे यांनी घेतलेल्या अनुभवांतून निर्माण होणारे कथाविषय फुलवताना ते मानवी मनाचे व्यापार जवळून उलगडून दाखवतात, त्यांचे विश्लेषण करतात आणि सामाजिक भानही जागवतात.
वाचकांच्या मनाला खिळवून ठेवणाऱ्या या कथा वाचकांची उत्कंठा वाढवतात आणि कथा संपल्यावरही मनात रेंगाळत राहतात…
– डॉ. शाश्वत शेरे
ज्येष्ठ मनोविकार तज्ञ, रत्नागिरी जिल्हा.




