रहस्यमय योद्धा अश्वत्थामा
₹200.00
(Rahasymay Yoddha Ashwatthama)
ले. डॉ. बाळकृष्ण पाडळकर
भारतीय संस्कृतीच्या अथांग परंपरेत ‘महाभारत’ हे महाकाव्य केवळ ऐतिहासिक किंवा पौराणिक ग्रंथ नसून, ते मानवी जीवनाचे गूढ तत्त्वज्ञान आणि नैतिक मूल्यांचे दर्शन घडवणारे एक अद्वितीय दर्पण आहे. या महाकाव्यातील प्रत्येक पात्र आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे आणि जीवनप्रवासामुळे वाचकांच्या मनात खोलवर ठसा उमटवते. अशाच गूढ आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे ‘अश्वत्थामा.’
अश्वत्थाम्याचे चरित्र हे पराक्रम, सूड, वेदना आणि शाप यांचे विलक्षण मिश्रण आहे. महाभारतातील घटनांमध्ये त्याची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्याच्या अमरत्वाच्या कथेमुळे तो आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो. ‘रहस्यमय योद्धा- अश्वत्थामा’ या ग्रंथाद्वारे या गूढतेच्या अनेक पैलूंना उलगडण्याचा एक प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न लेखकाने केला आहे.
या ग्रंथाचे लेखक डॉ. बाळकृष्ण पाडळकर यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेविषयी असलेली आस्था अत्यंत दृढ आहे. या पुस्तकात अश्वत्थाम्याच्या जीवनातील विविध घटनांचा ऊहापोह करताना मानवी स्वभावातील गुंतागुंत, कर्मफळाचा सिद्धांत, धर्म-अधर्म यातील सूक्ष्म सीमारेषा आणि नियतीचे अटळ स्वरूप यांचा त्यांनी वेध घेतला आहे.
हे पुस्तक वाचकांच्या मनात चिंतनाची ज्योत प्रज्वलित करील आणि त्यांच्या विचारविश्वाला अधिक समृद्ध करील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
– डॉ. राधाकृष्ण (महाराज) अप्पाराव अकोलकर
संतपीठ, श्रीक्षेत्र पैठण.




