Description
मूळ लेखिका : डॉ. पुष्पारानी गर्ग
अनुवाद : सौ. आशा वडनेरे
₹240.00
डॉ. पुष्पारानी गर्ग यांच्या ‘आतील सत्य’ या लघुकथा संग्रहातील कथा त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल असणाऱ्या प्रतिबद्धतेच्या प्रतिक आहेत. यातील अधिकांश लघुकथा सकारात्मक विचारांच्या प्रवर्तक आहेत. या कथासंग्रहातील विभिन्न कथांचा कॅनव्हास बराच विस्तृत आहे.
अनुवाद करणे म्हणजे एका प्रकाराने पुनर्निर्माण करण्यासारखे असते. या प्रक्रियेत मूळ कथांचे विषय, शरीर आणि आत्म्यासहित रुपांतरीत करायचे असते. मूळ कथावस्तू आणि तिचा आत्मा प्रामाणिकपणे भाषांतरात आणायचा असतो. सौ. आशा वडनेरे यांनी असाच सार्थक प्रयत्न केलेला आहे.
– शोभा खानवलकर, इंदूर.
***
अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत हिंदी भाषेतील श्रेष्ठ लेखिका डॉ. पुष्पारानी गर्ग या कवयित्री, ललित निबंधकार व कथाकार तर आहेतच पण त्याचबरोबर संत साहित्यावरही त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या लघुकथांचे वैशिष्ट्य म्हणजे या लघुकथा मध्यमवर्गीयांच्या परिस्थितीचा आढावा घेता घेता हळूच वाचकाच्या मनात प्रवेश करतात व त्यास विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या बहुतेक लघुकथा सहज व रोचक आहेत. कोठेही प्रसंगांचा पाल्हाळ नाही. त्यांच्या कथा मनात रेंगाळत राहतात.
– प्रकाशक.
***
मूळ लेखिका : डॉ. पुष्पारानी गर्ग
अनुवाद : सौ. आशा वडनेरे
मधुश्री प्रकाशनच्या पुस्तक संस्थळावर तुमचे सहर्ष स्वागत! या ठिकाणी पुस्तकांची माहिती पाहून तुम्हाला आमच्या +91 98509 62807 या whatsapp क्रमांकावर पुस्तकांची ऑर्डर देता येतील किंवा शेजारील whatsapp चिन्हावर क्लिक करून आम्हास थेट संपर्क करता येईल. (सर्व पुस्तकं खास सवलतीत उपलब्ध आहेत!) Dismiss