एक होता कॅन्सर

120.00

(आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.)

(Ek Hota Cancer)

आयुष्यात अनेक वळणं असतात. पण प्रियाच्या आयुष्यात आलं तसं वळण आलं तर धक्का बसतो. जगू म्हणत असताना एकदम शेवटचा झेंडा दिसावा तसं होतं. हे सहन करणं, त्याला तोंड देणं सोपं नसतं. पण हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की हे संकट प्रियानं एखादा प्रश्‍न हाताळावा तसं हाताळलं आहे. भावनाविवश न होता, पती जवळ नसताना, दोन मुलींना घेऊन तिनं कॅन्सरसारख्या रोगाला तोंड दिले, त्याच्याशी दोन हात केले. अतिशय शांतपणे नवनव्या उपचारांची माहिती घेऊन ते उपचार करून घेतले. अति भावनिक न होता हातपाय गाळून रोगाला शरण जाण्याचं तिनं नाकारलं व त्यात यशस्वीही झाली. हे सगळं विस्मयचकित करणारं आहे.
– डाॅ. छाया महाजन

कुठलीही व्याधी ही जीवनाशी निर्माण झालेला एक संघर्ष असतो. त्या अर्थाने कॅन्सर तर महायुद्धच! पण लढणारा योद्धा जर मनाने खंबीर असेल, कुठल्याही परिस्थितीला धीराने तोंड द्यायला सक्षम असेल, तर कुठल्याही युद्धात शत्रूपक्षावर मात करणे कठीण नाही हे समजून देणारी ही अनुभव गाथा म्हणजे एक होता कॅन्सर…
– श्री. रामदास के. कामत

मला काहीच होणार नाही असा आपला समज असतो. त्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होतं. छोट्या-मोठ्या तक्रारींच्या बाबतीत आपण शरीराचं ऐकत नाही आणि अचानक आपल्याला एखादा मोठा आजार झाल्याचं लक्षात येतं तेव्हा आपण खडबडून जागे होतो. अशा गृहीत धरण्यातून वाचकाला जागं करणारं हे पुस्तक आहे. प्रिया जोशी यांचं हे पुस्तक वाचल्यावर शारीरिक आजारातून बरं होण्यासाठी मानसिक शक्ती कशी मदत करू शकते याचा प्रत्यय आला. तिची या सर्व काळातील सकारात्मकता आपल्याला एक नवी ऊर्जा देऊन जाते. आपण गृहीत धरत असलेल्या गोष्टींतून जागं करण्याचं, आपल्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवण्याचं काम हे पुस्तक करतं.
– मुक्ता पुणतांबेकर.

Hats off!
Highly inspirational and exemplary! Regards and Best wishes!
Truly exceptional! Patients of cancer will benefit from your story.

= You can Gpay and WhatsApp your postal address to 9604858828 (Pooja Lonkar) =

Description

(A real life inspirational story of a victory on Cancer!)

You may also like…